ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली लस

0
36

शिरोळ (प्रतिनिधी) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविशिल्ड लस आज (सोमवार) घेतली. ही लस प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी यड्रावकर यांना दिली.

यावेळी मंत्री यड्रावकर यांनी शासनाकडून चालू असलेल्या लसीकरणाचे लाभ घ्यावा. ४५  वर्षावरील सर्व नागरिकांनी ही लस घ्यावी व कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये,  असे आवाहन मंत्री यड्रावकर यांनी केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.