नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल, हे काही सांगता येत नाही. कोणत्याही वेळी कोणत्याही युझर्सने आपले एखादं म्हणणं मांडावे आणि ते काही लोकांना पसंत पडावे. त्यापाठीमागून अनेक लोक त्या विषयांवर वेगवेगळे ट्विट करतात, तश्या पोस्ट शेअर करतात. आताही असाच प्रकार पाहायला मिळतोय. एका महिला शेतकरी नेत्याचा आंदोलनादरम्यान सँडल गायब झाल्यानंतर तिने सरकार आणि पोलिसांवर आरोप केले. याच आरोपांना घेऊन सोशल मीडियावर ‘सँडल वापस करो’चा ट्रेंड सुरु झाला आहे.

सोशल मीडियावर महिला शेतकरी नेत्याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या या महिला नेत्या गीता भाटीचा सँडल गायब झाला आहे. त्यानंतर गीता भाटीने सरकार आणि पोलिसांवर आरोप करताना म्हटले आहे. सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा. गीता भाटीच्या हास्यास्पद आरोपानंतर ट्विटरवरील युझर्सने गीता भाटी का सँडल वापस करो नावाने ट्रेंड केला आहे.

सरकार आणि पोलिसांनी दोघांनी मिळून माझा सँडल गायब केला आहे. त्यांनी तो लवकरात लवकर मला परत करावा, अशा आशयाचे गीताचे ट्विट युझर्सने जोरदार व्हायरल केले आहे. तसेच ते व्हायरल करताना त्याच्यावर जोक्स आणि मिम्स बनवले आहेत. हेच जोक्स आणि मिम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.