वेतवडे येथील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमाद्वारे दिला महिला सबलीकरणाचा संदेश

0
56

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील चौथीत शिकणाऱ्या तीन मुली व सातवीतील ३ मुलांनी आज (सोमवार) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वेतवडे ते मल्हारपेठ हे ११ किलोमीटर अंतर धावत जात महिला सबलीकरण, आरोग्य व स्त्री-पुरुष समानता याविषयी संदेश दिला.

या उपक्रमात चौथीतील श्रेया संजय सोनार, संचिता भिकाजी पाटील, गौरी आनंदा पाटील व सातवीतील समर्थ रामदास पाटील, तन्मय संजय पाटील, सूरज शंकर पाटील या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व विद्यार्थ्यांचे मल्हारपेठ, वाघुर्डे, सुळे व कोदवडे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी कौतुक व सत्कार केला. शाळेत आल्यानंतर या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्याध्यापक प्रकाश वातकर, वर्गशिक्षक जयवंत चौगुले, दिलीप पाटील, ऊर्मिला तेली, स्वप्नाली कलकुटकी, माणिक शिंदे, सरपंच सुनिता दळवी तसेच ग्रामस्थ संजय सोनार, शंकर पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.