अर्थसंकल्पाच्या अपेक्षेने शेअर बाजारात तेजी

0
23

मुंबई : आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद झाले. गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी, आर्थिक सर्वेक्षणातील काही सकारात्मक बाबी, विकासदराचा अंदाज आणि चांगल्या अर्थसंकल्पाच्या अपेक्षेनेही बाजारात तेजी दिसून आली.

बँकिंग सेक्टरमध्ये शेअर बाजारातील स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५० अंकांच्या तेजीसह ५९,५४९.९० अंकांवर स्थिरावला तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३ अंकांनी वधारत १७,६६२.१५ अंकांवर स्थिरावला.

शेअर बाजारात आज व्यवहार झालेल्या सूचीबद्ध कंपन्यांपैकी २३६८ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली, तर १०२६ शेअर दरात घसरण झाली. १३१ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.