मुंबई (प्रतिनिधी) :  सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरल्याचे दिसून आले. आज बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज २७४ अंकांची वाढ झाली, तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ८४ अंकांची वाढ झाली.

सेन्सेक्समध्ये आज ०.४५ टक्क्यांची वाढ होऊन तो ६१,४१८ अंकांवर पोहोचला, तर निफ्टीमध्ये ०.४६ टक्क्यांची वाढ होऊन तो १८,२४४ अंकांवर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही आज ११० अंकांची वाढ होऊन तो ४२,४५७ अंकांवर बंद झाला.