मुंबई :  शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांची मोठी निराशा झाल्याचे दिसून आले. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ५१८ अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १४७ अंकांची घसरण झाली.

सेन्सेक्समध्ये आज ०.८४ टक्क्यांची घसरण होऊन तो ६१,१४४ अंकावर बंद झाला. निफ्टीमध्ये आज ०.८१ टक्क्यांची घसरण होऊन तो १८,१५९  अंकावर बंद झाला. निफ्टी बँकमध्येही आज ९० अंकांची घसरण होऊन तो ४२,३४६ वर बंद झाला. शेअर बाजारात आज १४६२ शेअर्समध्ये वाढ झाली, २०१४ शेअर्समध्ये घसरण झाली. आज १७० कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.