नागपूर (प्रतिनिधी) : गेल्या महिनाभराच्या खंडानंतर पुन्हा राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने पूर्व विदर्भासह महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

येत्या चार दिवसांत मध्य महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. या अकरा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रविवारी (दि.२९) विदर्भासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. तर उस्मानाबाद आणि लातूर या २ जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे.