मुंबई (प्रतिनिधी) : काही कलाकारांची अवस्था आपला राष्ट्रीय पक्षी मोरासारखी आहे. मोराने पिसारा फुलवला की पाहणाऱ्यांकडून त्याचे कौतुक होते, म्हणून मोर खूश असतो. पण पिसारा फुलवणाऱ्या मोराचा पार्श्वभाग हा उघड असतो, अशी अवस्था अभिनेता अनुपम खेर या नटाची  झाली आहे. अर्थात अभिनेता म्हणून तो ग्रेटच आहे,  अशा शब्दांत निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी  संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अमेरिकन पॅापस्टार रिहाना,  पॅार्नस्टार मिया खलिफा यांनी पाठिंबा दिला आहे. यावर काही सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देत बाहेरील व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत प्रश्नावर काही बोलू नये, असे म्हटले आहे. यात अनुपम खेर यांनीदेखाल ट्विट केले होते. यावर टिळेकर यानी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला आहे.

अनुपम खेर अब तो तेरी खैर नही,  असे म्हणत इतर देशातील लोकांनी आंदोलनाचे समर्थन करत ट्विट केले म्हणून त्यांना अक्कल शिकवणारा हा नट आपल्या देशातील व्यक्ती इतर देशातील एखाद्या घटनेवर ट्विट करतो, तेव्हा का नाही टिव टिव करत ?, असेही टिळेकर यांनी म्हटले आहे.