…तर राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अधिकार : हायकोर्ट 

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचारी संपामुळे ग्रामीण प्रवासी, विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे त्वरित यावर तोडगा काढण्यात यावा, असा आदेश हायकोर्टाने आज (सोमवार) समिती आणि संघटनेला दिले. तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत न्यायालयाने खंत व्यक्त केली आहे. संपाबाबत मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली असून पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार आहे.  

संपकरी एसटी कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक कर्मचाऱ्यांना रोखत असतील आणि हिंसाचार करत असतील, तर राज्य सरकारला आवश्यक ती कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्य सरकारने अहवाल सादर करावा, याचबरोबर अन्य कर्मचारी संघटनांनी न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीपुढे आपले म्हणवे मांडावे. त्यानंतर समितीने या संघटनांचे आणि आणि एसटी महामंडळाचे म्हणणे ऐकून त्याबाबतच्या निष्कर्षाचा प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.