कळेतील ‘स्पार्क क्लब’ची सामाजिक बांधिलकी : निराधाराला दिला मदतीचा हात

0
198

कळे (प्रतिनिधी) : कळे (ता. पन्हाळा) येथील स्पार्क शूटिंगबॉल क्लबने एका निराधाराला जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला. येथील आनंद श्रीधर कुलकर्णी (वय ६४, निपाणी) हे स्क्रॅप गोळा करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले असून मुलगा सोडून गेला आहे. त्यांना दीपक सुतार याने त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यासाठी आश्रय दिला आहे. पडेल ते काम करत होते. दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी त्यांना धडपडावे लागत आहे.

चहासाठी ते बाजारवाडा परिसरातील सतीश जाधव यांच्या हॉटेलमध्ये जात असत. यांच्यासोबत त्यांची ओळख झाली. सतीश व्हॉलिबॉल खेळाडू असून क्लबचा सदस्य आहे. कुलकर्णी यांची याही वयात कष्ट करून खाण्याची जिद्द पाहून स्पार्क शूटिंग बॉल क्लबच्या खेळाडूंनी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. या वेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते कृष्णात पाटील, असिफ जमादार, सतीश जाधव, आबा कालेकर, फिरोज जमादार, अमोल सादुले, पिंटू जाधव, रमेश चांदणे, शैलेश कालेकर, पांडुरंग  लांबोर, मोन्या पाटील, जयसिंग जाधव आदी क्लबचे खेळाडू उपस्थित होते.