‘मर्दासारखं वाग जरा’ गाणं १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला : हर्षल सुर्वे

0
212

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडकिल्ल्यांचे संवर्धनासाठी युवकांसह जनतेमध्ये वेगळा आणि चांगला संदेश देण्यासाठी ‘मर्दासारखं वाग जरा’ हे गाणं तयार केले आहे. या गाण्याचे  दिग्दर्शन नितीन जाधव यांनी केले आहे. तर या गाण्यामध्ये कोल्हापुरातील सर्व कलाकार आहेत. हे गाणं १९ फेब्रुवारी शिवजयंती दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आ. ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली.

हर्षल सुर्वे म्हणाले की, या गाण्यामध्ये गडकिल्ल्यांच्यावर होणाऱ्या पार्ट्या आणि अश्लील प्रकार, बार-परमीट रुम, वॉईन शॉप यांना देण्यात येणारी गडकिल्ल्यांची नावे या गोष्टींवर प्रामुख्याने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. हे गाणं आ. ऋतुराज पाटील आणि हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे. याला पालकमंत्री सतेज पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे. याचे चित्रिकरण पन्हाळा आणि पावनगड येथे करण्यात आले आहे.

या गाण्यामध्ये संगीतकार ऐश्वर्य मालगावे, गीतकार युवराज पाटील, ध्वनिमुद्रण कार्डस दि म्युझिक स्टुडिओ कोल्हापूर, संकलन शेखर गुरव, छायांकन चेतन कुंभार, पोस्टर आर्टिझम ग्राफिक्स, सूचित पोतदार, फोटो अजय हारुंगले, गायक हर्षल सुर्वे, रंगभूषा दत्तात्रय जगताप, ड्रोन पायलट ओंकार झिरंगे ,जितेंद्र ठाकूर यांच्या सहकार्याने हे गाणं तयार करण्यात आले आहे.