कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथील मूळचे रहिवासी असलेल्या मेंगाणे-देशमुख कुटुंबाने गावात विविध विकासकामे करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. या कुटुंबाचे सामाजिक कार्य लक्षवेधी ठरले आहे.

मेंगाणे-देशमुख हे कुटुंब मुंबईतील विलेपार्ले येथे स्थायिक असून, १९६६मध्ये कै. गणपतराव ज्ञानू मेंगाणे-देशमुख यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केली आहेत. कोलोली या त्यांच्या मूळ गावी कोणत्याही राजकारणसी संबंध न ठेवता विकासकामे करण्याचे पाऊल उचलले. यासाठी त्यांनी गावातील समाजसेवक संभाजी जाधव यांच्याशी संपर्क साधत समाजकार्य सुरु केले.

प्रथम गावात कमान बांधली. त्यानंतर संभाजी जाधव यांच्या सूचनेनुसर गावातील गाडाईदेवी मंदिराच्या दगडी भिंतीचे काम पूर्ण केले. प्राथमिक शाळेच्या कमानीचे बांधकाम चालू असून ते थोड्याच दिवसात पूर्ण होईल. सुभाष, विजय, प्रताप व संजय या चारही भावांनी ३०-३५ लाख रुपये खर्च करून कोलोलीतील विविध विकासाकामे सुरु ठेवली. अशा विकासाकामामुळे मेंगाणे-देशमुख भावंडांचे पन्हाळा तालुक्यात कौतुक होत आहे. आई गाडाईदेवीचा आशीर्वाद त्यंच्या पाठीशी आहे. मेंगाणे-देशमुख कुटुंबीयांचे कंट्रक्शन, ट्रान्सपोर्ट व दुकाने असे अनेक उद्योग समूह आहेत. जरी गावापासून अनेक किलोमीटर अंतरावर दूर असले तरी मेंगाणे-देशमुख या परिवाराने सहकुटुंब सहपरिवार सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.