नगरसेवकाच्या निर्घृण हत्येचा थरारक व्हिडिओ व्हायरल (व्हिडिओ)

0
857

हैदराबाद (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील काकीनाडा येथे नगरसेवकाची कार खाली चिरडून निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीसी़टीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला हत्येचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मृत नगरसेवकाचे नाव काम्परा रमेश असे आहे. तर गुलजारा चिन्ना असे आरोपीचे नांव आहे. या खळबळजनक घटनेनंतर  काकीनाडा शहरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

CCTV footage of the incident kakinada corporater murder case. a man named Gurjala Chinna crushing Ramesh with his car. While some others tried to stop the car. However, Chinna had not restrained and moved the car forward faster and hit Ramesh thrice. pic.twitter.com/eMtc1WFWxk

— Ravindra (@i_am_Ravindra1) February 12, 2021

प्रत्यक्षदर्शींनी आरोपीची कार थांबवण्यासाठी प्रयत्न केला, पण मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चिन्नाने नगरसेवकाच्या अंगावर दोन ते तीन वेळा गाडी घातली. हत्येनंतर घटनास्थळावरुन फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी सीसी़टीव्ही फोटोजच्या आधारे अटक केली आहे.

मृत नगरसेवक काम्परा रमेश वायएसआर काँग्रेसचा असून एकेकाळी ते शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. नंतर त्यांचे वायएसआर नेते आणि मंत्र्यांशी संबंध आले. तसेच त्यांनी काकीनाडा महापालिकेत काँग्रेसचे फ्लोर लीडर म्हणून काम पाहिले आहे. ते जमिनीचे व्यवहार करत होते.