संशयित म्हणून ताब्यात घेतला अन् निघाला अट्टल चोर…

0
69

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील शहापूर पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतलेला प्रदीप मस्के हा संशयित अट्टल चोर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.  

मस्के हा तारदाळ येथे राहात असून पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटारसायकलीसह ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित प्रदीप मस्के यांनी अनेक ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिस रेकॉर्डवरील हा गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे शिवाजीनगर पोलीस ठाणे व गावभाग पोलीस ठाण्यात नोंद आहेत. पो. नि. प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे, हेडकॉन्स्टेबल महेश कोरे, यादव, लाटकर, साजिद कुरणे, अर्जुन फातले, अमित भोरे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.