मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  तर काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारी घेत उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी ४ डिसेंबररोजी सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व खासदारांसोबत ही बैठक होणार असून  कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यात येणार आहे. देशात आणि जगात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. रविवारी कोरोनाचे ४१,८१० रुग्ण सापडले होते. तर सोमवारी ३८,७७२ नवीन रुग्ण आढळून आले. तर ४४३ रूग्णांचा मृत्यू झाला. भारतात कोरोना संक्रमणाची संख्या ९४ लाखांवर पोहोचली आहे.