शिरोळ येथील वृध्द महिलेच्या खूनप्रकरणातील दुसऱ्या आरोपीला अटक…

0
26

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  चिंचवाड येथील वृद्धेच्या खून प्रकरणी पोलीसांनी प्रकाश नंदीवाले याला अटक केली होती. आता या प्रकरणी पोलीसांनी बजरंग उर्फ बाजीराव वसंत नंदीवाले (वय ३४, रा. नंदीवाले वसाहत, शिरोळ) याला अटक केली.

प्रकाश नंदीवाले याने चंपाबाई भुपाल ककडे या वृद्धेच्या घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. तसेच त्यांचा गळा दाबून खून करत  गळयातील, कानातील सोन्याची दागिने काढून घेत पोबारा केला होता. या गुन्हयात आणखीन एका आरोपीचा सहभाग असल्याची पोलीसांची खात्री झाल्याने आरोपी प्रकाश याला विश्वासात घेवुन या गुन्हयाबाबत चौकशी केली. यावेळी त्याने नंदीवाले वसाहतीमध्येच राहणारा त्याचा मित्र बजरंग उर्फ बाजीराव वसंत नंदीवाले याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

यावेळी पोलीसांनी सापळा रचला असता बजरंग हा केपीटी चौकात मिळून आला. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच गुन्हयाच्या अनुशंगाने सखोल त्याने हा गुन्हा आपला मित्र प्रकाश नंदीवाले यांचेसोबत संगनमत करुन गुन्हा केल्याची कबुली दिली.