टोप (प्रतिनिधी) : डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान अतिशय कष्टाने देश घडविण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपले पाहिजे, असे मत सुरेश नागावकर यांनी व्यक्त केले. नागाव (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना बाबा बाॅईजच्या वतीने संविधान दिनानिमित्त शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, संविधानामुळे सर्व सामान्य नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार प्राप्त झाले हक्क आहेत, तर सोबतच कर्तव्येही आहेतच. हक्क व कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशाच्या नागरिकांनी हक्क व अधिकाराबाबत जागरूक व आग्रह असताना कर्तव्यपालनाची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

समतानगर येथील बौध्द विहारात व दोन्ही शाळेत संविधानाचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय साहित्य, वही, पेनचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतीक कांबळे, अनिल शिंदे, विकास बाचणे, अतुल कांबळे, कुमार शर्मा, कुमार कांबळे, नीलेश कांबळे, संदीप कांबळे, निखिल जाधव, स्वप्नील डांगे, लखन कांबळे व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते.