साळवण (प्रतिनिधी) : शिक्षक बॅकेच्या निवडणूकीत सत्तारूढ गटाने सर्वाना विश्वासात घेऊन बहुमताने उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात कोणीही बंडखोरी केलेली नाही. संघाचे पदाधिकारी आजी- माजी संचालक प्रचारात जोमाने कार्यरत आहेत. सत्तारूढ शिक्षक संघ व पॅनेल भक्कम असून त्यामुळे यावेळीही सत्तारुढ मताधिक्याने विजय होईल असा विश्वास संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी व्यक्त केला. ते गगनबावडा तालुक्यातील तिसंगी येथे आयोजित प्रचार मेळाव्यात बोलत होते.

वरुटे म्हणाले की, सत्तारुढ गटातील जेष्ठ मंडळीनी मोठ्या मनाने रिंगणात न उतरता नव्या होतकरू प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी दिली आहे. त्यामुळेच शिक्षक सभासदांची साथ मिळत आहे. संचालकांच्या चांगल्या कामामुळेच समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. तर याप्रचारसभेस १०० हून अधिक सभासद उपस्थित असल्याचे सांगितले.

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे, प्रशांत पोतदार, शिवाजी पाटील, डी. पी. पाटील, तालुकाअध्यक्ष भैरवनाथ शिंदे, उमेदवार श्रीपती तेली, जिल्हाध्यक्ष संभाजी बापट, चेअरमन बाजीराव कांबळे, व्हा. चेअरमन बंजरंग लगारे, प्रशांत पोतदार, अरुण पाटील, दिलीप पाटील, पॅनेलमधील सर्व सभासद उपस्थित होते.