सत्तेतील मराठा समाज गरिबांची पोरगी करत नाही : प्रकाश आंबेडकर

0
83
(संग्रहित छायाचित्र)

पुणे (प्रतिनिधी) : सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांची पोरगी करत नाही, असे मला एका मराठा समाजाच्या व्यक्तीने सांगितले, असे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज (रविवार) येथे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्यात ‘गरीब मराठा समाज संवाद मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

आंबेडकर म्हणाले की, कॉलेजला असलेल्या मुला-मुलीची लग्नं जमतात. पण सत्तेत असलेला मराठा समाज गरीब मराठ्यांच्या मुलींशी लग्न करत नाही. त्यासाठी सामाजिक बदल होणे आवश्यक आहे, पण तो बदल होताना दिसत नाही. त्यामुळेच परिवर्तन होण्यासाठी गरीब मराठा मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.    काही मराठा नेत्यांनी गरीब मराठा मेळावा घेण्याची हिंमत दाखवली. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. जोपर्यंत गरीब मराठा सत्तेत येत नाही, तोपर्यंत बदल होण्याची अपेक्षा करता येत नाही. गरीब मराठा हा शब्द मी आणला आहे, असे आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.