गणुचीवाडी येथील इलेक्ट्रिक खांबाचा प्रश्न मार्गी…

0
104

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी गेले अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या गणुचीवाडी येथील इलेक्ट्रिक खांबचे काम काही दिवसातच पूर्ण केले. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

चंदगड तालुक्यातील गणुचीवाडी येथे शेतात जाणाऱ्या वाटेवर असणाऱ्या इलेक्ट्रिकल खांबच्या तारा खाली वाकलेल्या होत्या. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्या अतिशय धोकादायक बनल्या होत्या. रात्रीच्या तारा दिसत नसल्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता होती. यासाठी एमएसईबीकडून खांबचे पैसे भावे लागणार असे सांगण्यात आले होते. पण या कामाबद्दल संभाजीराव देसाई-शिरोलीकर यांनी हा प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्यातून मार्गी लावला. त्यामुळे गेली अनेक वर्षे रेंगाळलेला हा प्रश्न त्वरीत मार्गी लागल्यामुळे गणुचीवाडी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.