पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पण… : शरद पवारांची मोदींवर टीका  

0
98

रांची (वृत्तसंस्था) : केंद्रातील सत्ता भाजपच्या हातात गेल्यानंतर देशात जातीयद्वेषाचे विष वाढू लागले आहे. मागील १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, पंतप्रधानांकडे परदेशात जायला वेळ आहे, पश्चिम बंगालला जाण्यासाठी सवड आहे, मात्र २० किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या शेतकऱ्यांची भेट घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. आज (रविवार) रांची येथील हरमू मैदानात आयोजित  सभेत ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे. परंतु भाजप देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करीत आहेत, पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. मात्र, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही.