इचलकरंजीमधील जुना पूल वाहतुकीसाठी खुला…

0
22

इचलकरंजी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापुराने थैमान घातले होते. जिल्ह्यातील वारणा, पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे इचलकरंजीमधील जुना पुल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे इचलकरंजी, हुपरी, कागल वाहतूक बंद झाल्याने काही गावांशी संपर्क तुटला होता. परंतु, आज (गुरुवार) हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

धरण आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने विश्रांती दिल्याने पंचगंगा नदीचे पाणी आता ओसरु लागले आहे. पूर ओसरल्यानंतर पालिका प्रशासनाच्या वतीने पुरबाधित परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील शिरढोण, नांदनी या पुलावरील बंद असलेली वाहतूक देखील आता सुरू झाली आहे.