कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात २१, २६५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्या. यापैकी ४६१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला असून ६५४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ८२, आजरा – ०५, भुदरगड – १, चंदगड – ५, गडहिंग्लज- २२, गगनबावडा – ०, हातकणंगले – ७७, कागल – १२,  करवीर- ७०, पन्हाळा – ०७, राधानगरी – १, शाहूवाडी – १६, शिरोळ – ९८, नगरपरिषद क्षेत्र – ५६, इतर जिल्हा व राज्यातील – ९ अशा ४६१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ९९, ०४५ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ८८, ७८६

मृतांची संख्या – ५, ५७५

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४, ६८४