कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत १६७ जणांना लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ८९ जण बरे झाले असून १५१० जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १५४० झाली असून आजअखेर मृत रुग्णांची संख्या १८०० वर पोहोचली आहे.  

मागील चोवीस तासांत कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये कोल्हापूर शहरातील ६७, चंदगड तालुक्यातील ५, भुदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ११, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २२, पन्हाळा तालुक्यातील ९, राधानगरी तालुक्यातील ४, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ९, इचलकरंजीसह  नगरपालिका क्षेत्रातील १४ आणि इतर जिल्ह्यातील ११ जणांचा समावेश आहे. यादवनगर, कोल्हापूर येथील १ आणि गडहिंग्लज तालुक्यातील १ अशा दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५३,४४०, डिस्चार्ज – ५०,१००, उपचारासाठी दाखल रुग्ण – १५४०, मृत्यू – १८००.