सावधान ! जिल्ह्यात चोवीस तासांत वाढली कोरोना रुग्णांची संख्या…

0
406

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे, जो चिंतेचा विषय आहे. मागील चोवीस तासांत ५१ रुग्णांची भर पडली आहे. तर १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २२३ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात १८७४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर शहरातील २४, आजरा व कागल तालुक्यातील प्रत्येकी १, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी २, गडहिंग्लज तालुक्यातील ४, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १० अशा एकूण ५१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे –

एकूण रुग्ण – ५०,३३७, डिस्चार्ज – ४८,३७३, उपचारासाठी दाखल रुग्ण – २२३,  मृत्यू – १७४१.