कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागलीय. रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूदरातही चांगलीच घसरण होत आहे. महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या संख्या तीन हजारांहून कमी झाली आहे. मागील चोवीस तासात तब्बल १४९६८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी केवळ १८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४४३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ५५, आजरा – ८, भुदरगड – १, चंदगड – १, गडहिंग्लज – २, गगनबावडा – ०, हातकणंगले – २२, कागल – ९,  करवीर – २७, पन्हाळा – ९, राधानगरी – २, शाहूवाडी – १, शिरोळ – ११, नगरपरिषद क्षेत्र – ३२, इतर जिल्हा व राज्यातील – ०३ अशा १८३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

 

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – २, ०१, ४७४ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९३, ०५८

मृतांची संख्या – ५, ६३२

उपचार सुरू असलेले रुग्ण –  २, ७८४