कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणावर ओसरू लागलीय. रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूदरातही चांगलीच घसरण होत असल्याने प्रशासनावरील ताण कमी होत आहे. बऱ्याच दिवसांनंतर सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांहून कमी झाली आहे. मागील चोवीस तासात ३७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला असून ४७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ७५, आजरा – ७, भुदरगड – १, चंदगड – ०, गडहिंग्लज – १६, गगनबावडा – ०, हातकणंगले – ५२, कागल – ११,  करवीर – ५८, पन्हाळा – २१, राधानगरी – ६, शाहूवाडी – २०, शिरोळ – ४५, नगरपरिषद क्षेत्र – ५९, इतर जिल्हा व राज्यातील – ०३ अशा ३७४ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – २, ००, ७३१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९१, १९४

मृतांची संख्या – ५, ६१३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ३,९२४