कोल्हापूर (प्रतिनिधी) : ना. हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेला दहा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स प्रदान करण्यात आले. आज (शनिवार) शासकीय विश्रामगृह परिसरात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही मशीन्स आयुक्त कादंबरी बलकवडे यांचेकडे सुपूर्त केली.

ना. मुश्रीफ म्हणाले की,  कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची टंचाई ओळखून फाउंडेशनच्यावतीने पाचशेहून अधिक कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आली आहेत. सीपीआरसह जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर व दवाखान्यांना ही मशीन्स दिली आहेत.

या वेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ‘ब्रिस्क’चे संचालक चंद्रकांत गायकवाड, महापालिका उपायुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे आदी उपस्थित होते.