कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  महापालिकेच्या वतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाईचा धडका सुरू केला आहे. त्यानुसार रंकाळा चौपाटीवरील खाऊचे स्टॉल आणि रंकाळ्याजवळील ‘डी मार्ट’ येथे तपासणी करण्यात आली. यावेळी येथे कोरोना नियमांचा भंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले असता महापालिकेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.          

डी मार्टमध्ये सोशल डिस्टंन्सचे पालन होत नसल्याने ४ हजारचा दंड करण्यात आला. तसेच रंकाळा चौपाटी येथे विनामास्क फिरणाऱ्या ९४ नागरिकांच्यावर कारवाई करुन ९ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर फुलेवाडी नाका येथील हॉटेल कृष्णा डिलक्सवरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक आयुक्त संदीप घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त चेतन कोंडे,   केएमटी पथकाकडील सुनिल जाधव, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने  केली.