Published May 8, 2023

मुंबई ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाज उठवत ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर बंदी घालणे आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या सिनेमाने ओपनिंग डेला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर वीकेंडलादेखील या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार The Kerala Story हा सिनेमा रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 16.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 35.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी जरी या सिनेमाला विरोध केला असला तरी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची स्थिती आहे.

नेमकं काय सांगतो ‘द केरळ स्टोरी’ ?

अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इडनानी आणि सोनिया बलानी स्टारर ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा जगभरात चर्चेत आहे. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा ‘द कश्मीर फाइल्स’चा रेकॉर्ड मोडणार, असा अंदाज वर्तवला जात आहे. केरळमधील मुलींचं धर्म परिवर्तन करुन त्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये कसं सामील केलं जातं हे सांगणारा ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा आहे.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023