मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खळबळ माजली आहे. एवढेच नाही तर शिवसेना हा पक्षही फुटला आहे. अशात ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होण्याच्या आधीच महाविकास आघाडी सरकारला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आम्ही सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे.

बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षांचा दुरूपयोग सुरू असल्याचा दावाही बंडखोर आमदारांनी केला आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताकारणाचा खेळ सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.