कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी आपला उमेदवारी अर्ज बँकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या निवडणूक कार्यालयात येऊन दाखल केला. तर पालकमंत्री सतेज पाटील यांनीही शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

ना. पाटील यांनी गगनबावडा सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी त्यांच्यासोबत ६६ पैकी ४९ सभासद लाल रंगाचा फेटा बांधून त्यांच्यासोबत आले होते.