आम्ही कोल्हापुरी… किंक्रांतीच्या शुभेच्छा देतो ‘लई भारी ! (व्हिडिओ)

0
172

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सोशल मीडियावर मकर संक्रांतीनिमित्त्त शुभेच्छांचा वर्षाव होत असताना शुक्रवारी होणाऱ्या किंक्रांतीच्याही शुभेच्छा दिल्या जात आहेत. सणांच्या निमित्ताने शुभेच्छा देणे ही भारतीय परंपरा आहे, संस्कृती आहे. काळ बदलतो तसे शुभेच्छांचे स्वरूपही बदलते. वेगळ्या पद्धतीने, ‘जरा हटके’ पद्धतीने शुभेच्छा देण्यात कोल्हापूरकर नेहमीच ‘लई भारी’ ठरतात. खासबाग मैदानाजवळ उभारण्यात आलेल्या फलकावरील मजकुराची चर्चा शहरात चांगलीच होऊ लागली आहे. हा मजकूर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.


खासबाग मैदानाजवळील प्रिन्स क्लबच्या फलकावरील मजकूर असा -:  

‘‘ सर्वांना किंक्रांतीच्या शुभेच्छा… आज गुळमाट उद्या खाटकुट…

स्वर्गवासी होणाऱ्या बोकड, बकरी आणि कोंबड्यांना श्रध्दांजली…

तिळगूळ घ्या गोड बोला…’’