विमान देण्यावरून राज्यपाल-राज्य सरकार यांच्यात पुन्हा जुंपली…

0
113

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शासकीय विमान नाकारले गेले आहे. देहरादूनला जाण्यासाठी आधी विमानाची नोंदणी करण्यात आली होती. मात्र, राज्यपाल विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर राज्यपाल स्पाईस जेटच्या विमानाने रवाना झाले. मसुरीला आयएएस प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रमासाठी राज्यपाल निघाले होते. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आधीही अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी राज्यपालांवर टीका केली होती. तर राज्यपाल यांनी ही ठाकरे सरकारमध्ये काहीतरी गडबड आहे असं वक्तव्य केलं होते. त्यामुळे राज्यपाल विरूद्ध महाविकासआघाडी सरकार असा वाद आता शिगेला पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल आता आमने-सामने आले आहेत.