लाल मातीनं दिलेलं वैभव हीच खरी श्रीमंती : अजित ताम्हणकर

0
52

कोल्हापूर प्रतिनिधी : लाल मातीने दिलेले वैभव हीच खरी श्रीमंती आहे. बालमनावर व्यायामाचे मल्लविद्येचे संस्कार रुजवणाऱ्या उंचगावमधील बजरंग आखाड्याचे पैलवान जयवंत पाटील आणि अनिता पाटील यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. असे मत कोल्हापूर आरटीओ अधिकारी अजित ताम्हणकर यांनी व्यक्त केले.

करवीर तालुक्यातील उंचगाव येथे बजरंग आखाड्याच्या संस्थापिका अनिता पाटील यांची महिला कुस्ती मल्लविद्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. तर ॲड. पुनम ताम्हणकर यांची महिला कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापूरच्या कायदेशीर सल्लागार पदी निवड झाली. याबद्दल त्यांचा सत्कार मोहन सातपुते,  उंचगावचे पोलीस पाटील स्वप्नील साठे , सचिन राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पै. जयवंत पाटील, गणेश चव्हाण, कृष्णा देसाई, सौ. शिंदे, डायमंड ग्रुपचे संदीप पाटील, आखाड्याचे सर्व पैलवान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here