मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माविरोधात भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी ब्लॅकमेल केल्याची तक्रार केली. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांचे जावई पुरूषोत्तकम केंद्रे यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

पुरूषोत्तम केंद्रे यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, आपल्याला २०१९ पासून तीन जण ब्लॅकमेल करत आहेत. यामध्ये मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणू शर्माचाही समावेश आहे.

दरम्यान, रेणू शर्माने धनंजय मुंडेवर आरोप केल्यानंतर मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत खुलासा केला आहे. त्यानंतर रेणू शर्मावर भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे आणि मनसे नेते संतोष धुरी यांनी आपल्यालाही रेणूने ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष करत असताना दोन्ही नेत्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे पक्षाने तूर्तास त्यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचे सांगितले आहे.