टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील तासगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी चंद्रकांत आण्णा गुरव यांची तर उपसरपंच सौ. पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी काम पाहिले. या निवडीनंतर समर्थकांनी जल्लोष केला.

तासगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज (मंगळवार) सरपंच निवडीसाठी विशेष सभा पार पडली. सरपंचपदासाठी आरक्षित नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) या प्रवर्गातून बिनविरोध निवडून आलेले चंद्रकांत गुरव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सभेत घोषित करण्यात आले. त्याचप्रमाणे उपसरपंच पदासाठी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडल्या गेलेल्या सौ. पौर्णिमा आदिनाथ कांबळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांचीही उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव पाटील, संपतराव पाटील, जनार्दन पाटील, रघुनाथ सुतार, सागर पाटील, ग्रामसेविका एस. एस. दगडे, तलाठी जाधव यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.