मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यात डेल्टा प्लसच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत डेल्टा प्लसने एका साठ वर्षीय महिलेचा पहिला बळी घेतला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यानंतर तिला कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटची लागण झाली आणि त्यातच या महिलेचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत बुधवारी डेल्टाप्लस बाधित ७ रुग्ण आढळून आली होती.  दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून डेल्टा प्लसने झालेला हा पहिला मृत्यू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.