कोल्हापूर (प्रतिनिधी) : पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.  अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या निधनामुळे कुस्ती विश्वात शोककळा पसरली आहे.

त्यांचे पार्थिव शाहूपुरी तालमीत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.  त्यानंतर त्यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी नेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा हे खंचनाळे यांचे मूळ गांव. कुस्तीचे धडे घेण्यासाठी ते कोल्हापुरात आले. १९५९ मध्ये पंजाब केसरी बनाता सिंग याला अस्मान दाखवून हिंदकेसरी गदा मिळवली. त्यानंतर त्यांनी कराड येथील आनंद शिरगावकर यांना चितपट करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला होता. त्यांनी १९५८, १९६२, १९६५ मध्ये झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धा जिंकल्या होत्या.

.