कोल्हापुरात रविवारी ‘नृत्य परिषदे’चे पहिले विभागीय संमेलन

0
209

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरमध्ये प्रथमच मोठ्या दिमाखात राज्य नृत्य  परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संमेलन रविवारी (दि.१७) गडकरी हॉल येथे आयोजित केले आहे. यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर येथील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून नृत्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व प्रमुख व्यक्ते म्हणून नागपूर जिल्हा नृत्य परिषदेचे अध्यक्ष भुपेश मेहेर, राज्य कार्यकारणी सदस्य  जतीन पांडे, राज्य उपाध्यक्ष रत्नाकर शेळके, राज्य कार्यवाह आशुतोष राठोड, राज्य सल्लागार अभिजात संकाये, मराठवाडा विभाग प्रमुख मयूर राजापुरे, डॉ. विनोद निकम आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागीय समितीचे पदग्रहण समारंभ होणार आहे. तसेच माननीय मेघराज राजे भोसले यांचे अमृत बोल व प्रमुख वक्ते भुपेश मेहेर यांचे व्याख्यान तसेच जतीन पांडे यांचे मार्गदर्शन आणि दीपक बिडकर यांचे अभ्यासक्रमाविषयीचे मार्गदर्शन व डॉ.विनोद निकम हे संघटन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे नियोजन पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सागर बगाडे आणि नृत्य परिषद कोल्हापूर शाखेने केले आहे.