कोल्हापूर (प्रतिनिधी) : म्युझिक लवर्स ग्रुप प्रस्तुत स्वरलता अवॉर्ड २०२२ या स्पर्धेचा अंतिम सोहळा उद्या (शनिवार) रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला कोल्हापुरातील अग्रगण्य चॅनेल ‘लाईव्ह मराठी’ हे डिजीटल पार्टनर आहेत.

या ग्रुपतर्फे हौशी महिला गायिका यांच्यासाठी कराओके गायनाची ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला ऑडिशन राऊंड करिता कोल्हापूर, सांगली, रत्नागिरीमधून चांगला प्रतिसाद मिळाला होता. पहिल्या राऊंड मधून सेमीफायनल करिता २० महिला स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. आता अंतिम फेरीत दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली असून मोठ्या जल्लोषात हा महाअंतिम सोहळा होणार आहे.

या महांतीम सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मासन शर्मिला, मिस्कीन डेप्युटी कमिशनर या उपस्थित राहणार असून एव्हरेस्ट शिखर सर करणारी कस्तुरी सावेकर या करवीर कन्येचा सत्कार याप्रसंगी केला जाणार आहे. तरी या रंगतदार सोहळा करता रसिक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन म्युझिक लवर्स ग्रुप तर्फे करण्यात आले आहे.