यड्राव येथील ओंकारेश्वर मंदिरातून भाविकांना हाकलले

0
39

शिरोळ (प्रतिनिधी) : यड्राव येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दर्शनासाठी मंदिर बंद  केले होते, तरीदेखील मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर भाविकांनी नारळ व पुष्पहार  वाहून दर्शन घेतले. काही भाविक तर विनामास्क  आले होते. याची माहिती समजताच शहापूर पोलिसांनी मंदिर परिसरातून भाविकांनी पांगवत त्यांना हाकलून लावले.

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन महादेव मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. परंतु नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी करून कोरोना  नियमांना हरताळ फासला. पोलिसांनी गर्दी पांगवत भाविकांना  हाकलून लावले. ओंकारेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.