रुईमध्ये मुलाची भांडणे सोडवण्यास गेलेल्या वडिलांचा मृत्यू : एकाला अटक

0
57

कुंभोज (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील रुई येथे प्रकाश लक्ष्मण माने हे आपला मुलगा विनोद माने आणि मारुती सिद्धू चंपू यांच्या दोघातील भांडण सोडवण्यासाठी गेले होते. यावेली मारुती चंपूने प्रकाश माने यांना ढकलून दिल्याने ते जागीच डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मारूती चंपू याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुती चंपू हा व्यवसायाने सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्याकडे विनोद माने हा काम करीत होता. त्याने आरोपीकडून काही पैशांची उचल केली होती. तो कामाला येत नसल्याने चंपू याने त्याच्या घरी जाऊन तू कामाला का येत नाहीस अशी विचारणा करत त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. हे पाहून प्रकाश माने हे या दोघांची भांडणे सोडवण्यासाठी गेले. यावेळी मारुती चंपूने प्रकाश माने यांना जोराचा धक्का दिल्यामुळे प्रकाश माने हे डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी सुधीर कमलाकर यांच्या फिर्यादीनुसार हातकणंगले पोलीस ठाण्याने मारुती चंपु याला अटक केली आहे. तसेच त्याला इचलकरंजी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.