कोल्हापूर (प्रतिनिधी) : म्हारूळ (ता.करवीर) येथील एका तरुणाला आसाम रायफलमध्ये नोकरीचे आमिष दाखवत बनावट नियुक्तीपत्र देऊन त्याची ६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी दत्तात्रय कुंडलिक सुतार (वय २८, रा.म्हारूळ ता. करवीर) यांने चुलत मामा दत्तात्रय बळवंत सुतार (रा.सांगरूळ ) आणि शिवाजी कदम (रा.आवळी, ता.पन्हाळा) या दोघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय सुतार यांचा भाऊ रोहीत सुतार याला आसाम रायफलमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्याच्याकडून चुलत मामा दत्तात्रय सुतार आणि शिवाजी कदम यांनी ६ लाख रूपये घेतले होते. यानंतर त्या दोघांनी रोहीत सुतार याला पुणे, आसाम, दिल्ली याठिकाणी फिरवून बनावट नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर रोहीत याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांने आपला भाऊ दत्तात्रय सुतार यांना याबाबत माहिती दिली. याप्रकरणी त्यांचा चुलत मामा दत्तात्रय सुतार व शिवाजी कदम या दोघांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.