प्रेमाचा ‘रंग’ ग्रामपंचायतीने केला ‘भंग’…

0
75

यड्राव (प्रतिनिधी) : प्रेमात कोणीही काहीही करू शकते, याची उदाहरणे आपण अनेकदा बघीतले आहे. असाच एक वेगळा प्रयोग शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथे एका प्रियकरांने केला होता. ‘क्यूँ की’ या हिंदी चित्रपटाप्रमाणे धरणगुत्ती ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल अडीच कि.मी.  रस्त्यावर ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ असे ऑईलपेंटने असे लिखान केले होते. याचे वृत्त काल (सोमवार) लाईव्ह मराठीने प्रसिध्द केले होते. याची कोल्हापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.

तर बदनामीच्या भितीने धरणगुत्ती ग्रामपंचायतीने ही अक्षरे पुसण्याची नामुश्की ओढावली आहे. त्यामुळे प्रेमाचा रंग ग्रामपंचायतीने केला भंग असे म्हणण्याची वेळ आली आहे. अखेर ग्रामपंचायतीने आज (मंगळवार)  ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’  या अक्षरांवर रंग लावत पुसून काढला आहे. याबाबत धरणगुत्तीचे ग्रा.पं. सदस्य शेखर पाटील यांनी,  अशा घटनांमुळे गावची बदमानी होत आहे. हे थांबवण्यासाठी अक्षरे काढलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॉमेराच्या माध्यामातून त्या प्रेमवीराचा शोध घेत आहे. शिवाय पोलिसात त्यावर गुन्हाही दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.