स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण…; भाजप नेत्याची टीका

0
49

मुंबई (प्रतिनिधी) : स्वतःसाठी एक नोकरी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, कारण स्वतः बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात. स्वतः काहीतरी करतील तरच नोकरी व व्यवसायाची किंमत कळेल, अशा शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.   

गेल्या सात महिन्यांपासून कोरोनामुळे संपूर्ण उद्योग- व्यवहार बंद होते. आता त्यांना गती मिळू लागली आहे. देशविदेशातील १५ मोठ्या उद्योगसमूहांनी राज्यात सुमारे ३५ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करारावर सोमवारी स्वाक्षऱ्या केल्या. या करारांमुळे राज्यात २३ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. तसेच येत्या दोन महिन्यांत आणखी काही मोठ्या गुंतवणुकीचे करार होणार होणार आहेत. त्यामुळे राज्यात एक लाख कोटींची  गुंतवणूक होईल, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे. दरम्यान, यावरून निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.