नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अ. भा. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यू  गळफास घेतल्याने गुदमरुन  झाल्याचे पोस्टमॉर्टम  अहवालातून समोर आले आहे. यामुळे नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रयागराजमधील एसआरएन हॉस्पिटलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग  करून नरेंद्र गिरी  यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. त्यांच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या गळ्याभोवती फास घेतल्यानंतर येणारा व्ही मार्क दिसत आहे.

नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी अलाहाबादेतील बाघंबरी मठात त्यांच्या शिष्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला होता. यावेळी तेथे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप करत अनेकांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले होते. यानंतर ही हत्या की आत्महत्या असा संशय व्यक्त केला जात होता.  याप्रकरणी पोलिसांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी याला अटक केले आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.