सराफ बाजारही बंद राहणार…

0
89

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नवीन कृषी कायद्याच्या विरोधासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे आज (मंगळवारी) पुकारण्यात आलेल्या भारत बंदला येथील सराफ व्यापारी संघाने पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिली.

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध संघटना उद्याच्या बंदला पाठिंबा जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेनेही बंद कडकडीत पाळण्याचे आवाहन केले आहे. व्यापारी संघटनाही पाठिंबा देत आहेत. सराफ व्यावसायिकांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने सोने, चांदी खरेदी व्यवहार बंद राहणार आहेत.