कोल्हापूर  (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतून साकारलेलं  ‘आजचा निश्चय  – पुढचं पाऊल’ ही पुस्तिका मराठा समाजाला उपयुक्त ठरणारी आहे,  असे प्रतिपादन अखिल मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले. शाहू स्मारक येथे आज (शनिवार) पुस्तकाचे प्रकाशन आणि मराठा समाज मेळाव्यात मुळीक बोलत होते. अध्यक्षस्थानी गुलाबराव घोरपडे होते.

या पुस्तकात अनाठायी रूढींना फाटा देत विज्ञानवादी आचारसंहिता,  कुटुंब व्यवस्था, जमिनीचे रेकॉर्ड,  प्रगतशेती,  जात,  नॉन क्रिमीलेअर दाखले,  अण्णासो पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना,  सारथी संस्थेच्या योजनासह शासकीय शिष्यवृत्ती, सोशल मीडिया आदी माहिती  दिली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या कल्पनाताई चौगले,  पत्रकार सुनील पाटील, पत्रकार एकनाथ नाईक, पत्रकार निलेश जाधव, पत्रकार अमर पाटील, किरणसिंह चव्हाण, संदीप जाधव, आझाद नाईकवडी, विजय मुतालिक यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. संदीप साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.  यावेळी कृष्णाजी हरगुडे,  शैलजा भोसले,  उषाताई लांडे,  नेहा पाटील, प्रकाश पाटील, किशोर कदम, राजेंद्र खेराडे, सचिन इंगवले, अमरसिंह पाटील, राजू परांडेकर, सरदार पाटील,  महादेव पाटील,  मच्छिंद्र पाटील  आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. चंद्रकांत चव्हाण यांनी सूत्रसंचलन केले. अवधुत पाटील यांनी  आभार मानले.