इराणी खणीत सापडला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह

0
81

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इराणी खणीमध्ये गुरुवारी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आज (शुक्रवार) आढळून आला. विनय बाबूराव कांबळे (वय २८, रा, शिंगणापूर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये याची नोंद झाली आहे.

गुरुवारी सायंकाळी इराणी खण येथे बसलेला तरुण पाय घसरून पाण्यात पडल्याची माहिती रंकाळा परिसरात फिरायला आलेल्या काही नागरिकांनी जुना राजवाडा पोलिसांना कळवली होती. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली होती. आज शुक्रवारी पुन्हा शोध घेतला असता दुपारच्या सुमारास खणीत त्याचा मृतदेह आढळून आला. खणीच्या बाजूला लावलेल्या मोटरसायकलवरून त्याची ओळख पटली.